सौ.सुमतीबाई गुणाले शिक्षण प्रसारक मंडळची स्थापना 12 मे 1993 साली झाली संस्थेने विविध समाज उपयोगी कामे केली व करत आहे संस्थेमार्फत विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मानधन सुरू करण्यासाठी संस्थेने तहसील कार्यालय अंबाजोगाई येथे शिबिर घेऊन प्रस्ताव तयार करून तहसील कार्यालयात सादर केले,रक्तदान शिबिर , 60 वर्ष पुढील वृद्धांची शिबिर घेवुन मोफत नेत्र तपासणी करून चष्मे वाटप केले तसेच दंत तपासणी शिबिर,निसर्ग संपदा वाढवण्यासाठी वृक्षारोपण, ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगार मिळवा यासाठी प्रशिक्षण दिले, पाणी फाउंडेशन या संस्थे सोबत गावात पाणी आडवा पाणी जिरवा या योजनेत सहभागी होऊन शेततळे, बोरवेल पुनर्भरण, बांधबंधिस्ती असे कामे केली संस्था विविध समाज उपयोगी काम करत असताना असताना संस्थेचे सचिव श्री.दिनकर तुळशीराम गुणाले सर हे अंबाजोगाई जिल्हा बीड येथील मतिमंद मुलांच्या शाळेत सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करत होते सदर शाळा ही अठरा वर्षाच्या आतील मुलांची होती या शाळेतील अठरा वर्षे पूर्ण झालेल्या मतिमंद मुलांना शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी पुढील कार्यशाळा ही मराठवाड्यामध्ये कुठेही नव्हती पुणे मुंबई सोलापूर या ठिकाणी कार्यशाळा होत्या परंतु सदरील कार्यशाळेत मोठ्या प्रमाणात फीस घेतली जात होती गुणाले सर ज्या शाळेत काम करत होते ही शाळा मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भाग असलेल्या अंबाजोगाई येथील होती या शाळेतील मुलांचे पालक मोल मजुरी करून स्वतःची उपजीविका भागवत होते त्यांना या मुलांची फीस भरून इतर ठिकाणी ठेवणे शक्य नाही अशा व इतर पालकांनी गुणाले सरांना विनंती करून आपण आपल्या संस्थेमार्फत दिव्यांग अठरा वर्षाच्या पुढील मुलांची शाळा काढावी अशी विनंती केली गुणाले सरांनी या अठरा वर्षे पुढील मुलांचा अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की सदरील मुलेही गावात व्यसनाधीन होऊन नाममात्र पैसे घेऊन बिगारी काम करत आहेत काही मुलं वय वाढल्यामुळे रागीट स्वभाव होऊन आई वडील यांना मोठ्या प्रमाणात मारहाण करीत होतो सदरील सर्व गोष्टीचा अभ्यास करून दिनकर गुणाले सरांनी जून 1999 यावर्षी दिव्यांग मुलांची कार्यशाळा सुरू केली सदरील शाळेत सेवा मतिमंद विद्यार्थ्याचे निवासी शेतकी पुनर्वसन शिक्षण प्रशिक्षण केंद्र असे नाव ठेवले या शाळेतून अठरा वर्षांपूर्वी मतिमंद मुलांना प्रवेश दिला जातो सदरील शाळा ही शेतकी कार्यशाळा असल्यामुळे शेती संबंधित विषयाचे प्रशिक्षण या शाळेतील मुलांना दिले जाते सुधिर शाळा ही निसर्गरम्य वातावरणात असल्यामुळे सदरील शाळेच्या ठिकाणी वातावरण हे प्रसन्न व हवेशीर आहे या शाळेत मुलांना गोपालन, कुक्कुटपालन, गांडूळ खत निर्मिती, रोपवाटिकेत विविध रोपे तयार करून वृक्षाची लागवड , यासोबत दिवाळीनिमित्त लागणारे दिवे व आकाश कंदील बनविणे, कागदी लिफाफा तयार करणे, फाईल कव्हर तयार करणे यासोबत दिव्यांगच्या स्पेशल ओलंपिकच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर या कार्यशाळेतील विद्यार्थ्यांनी पदक मिळवलेली आहेत या कार्यशाळेतील मुलांना प्रशिक्षण घेत असताना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देऊन प्रशिक्षण दिले जाते प्रशिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजात सन्मानानं चांगलं जिवन जगता यावे हा उद्देश संस्थेचा व शाळेचा आहे