सेवा मतिमंद विद्यार्थ्यांचे निवासी विद्यालय
धानोरा खुर्द, तालुका अंबाजोगाई
धानोरा खुर्द, तालुका अंबाजोगाई
सौ. सुमतीबाई गुणाले शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना १२ मे १९९३ रोजी झाली असून त्यांनी विधवा, वृद्ध, ग्रामीण महिला व पर्यावरणासाठी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले.
१८ वर्षांवरील दिव्यांगांसाठी "सेवा मतिमंद विद्यार्थ्याचे निवासी शेतकी पुनर्वसन शिक्षण प्रशिक्षण केंद्र" सुरू करून शेती, हस्तकला व स्वावलंबनाचे प्रशिक्षण दिले.
या केंद्रातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पेशल ऑलंपिकमध्ये पदके जिंकली असून, त्यांना सन्मानाने जगण्याचे कौशल्य देणे हा संस्थेचा उद्देश आहे.